धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खतावरील सबसिडीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या खतांच्या किमतीच्या देशातील शेतकऱ्यावर कसलाही आर्थिक बोजा येणार नाही त्यांना जुन्याच दराने खत मिळू शकेल हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये खत मिळणार आहे त्याच बरोबर केंद्र सरकारने अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या पिकासाठी वेळोवेळी हमीभाव वाढवून त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी म्हटले आहे.
कोळगे यांनी पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रातले महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना नमो महासन्मान शेतकरी योजनेतंर्गत सहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमामधून प्रतिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही अद्यापपर्यंत च्या काळामध्ये कांदा अनुदान ,सततच्या पावसाचे अनुदान ,पिक विमा व अशा प्रकारचे विविध अनुदान शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांना अडचणीच्या खाईतून बाहेर काढण्याचे काम राज्य सरकार देखील करत आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फक्त इथेनॉलवर चालणारी इनोव्हा गाडी लॉन्च केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार आहे. असे अनेक पटीने शर्तीचे प्रयत्न करून केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांना मजबूत बनवण्याचे काम करत असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा धाराशीव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे .