धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला गावागावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. धाराशिव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पोहनेर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश देणार नाही असा निर्धार केला आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच अशा आशयाचा फलक लावून नेत्यांना गावबंदीचा संदेश पोहनेर येथील सकल मराठा समाजाने दिला आहे.


 
Top