धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ,  मानाचा गणपती गणला गेलेल्या मंडळास जिल्हा पोलीस कार्यालय यांच्या वतीने  जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व  मोठी शिल्ड पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. 

मंडळाच्या विविध सामाजिक, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक या विविध क्षेत्रातील ज्वलंत प्रसंगांचे व समाज प्रबोधन, जनजागरण विविध क्षेत्रातील विविध विषयावर जनप्रबोधन करणारे एकमेव मंडळ, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले मंडळ व 1964 पासून आज तागायत मूर्तीच्या स्वरूपामध्ये हलतय देखावे तयार करणारे, देखावा विकत आणला जात नाही व देखावा विकला जात नाही. इथेच बनवणारा मूर्तिकार, कलाकार, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू, गुणवंत कामगार पुरस्कार  काशिनाथ दिवटे व त्यांचे सहकारी इत्यादींनी आपले कार्य अखंडपणे निस्वार्थ भावनेने व कसल्याही प्रकारची मानधन व मोबदला याची अपेक्षा न ठेवता भक्ती श्रद्धा या माध्यमातून श्री च्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करणारे. स्वयंस्फूर्तपणाने स्वयंसेवक असलेले मंडळ एक आदर्श मंडळ म्हणून आजपर्यंत त्याची ख्याती आहे. मंडळाचे सर्व लहान थोर गणेश दूूत, गणेश सेवक, गणेश भक्त व पदाधिकारी अत्यंत तळमळीने समाजसेवेचे कार्य करीत आलेले आहेत ,या 59 वर्षात केलेल्या कार्याची पावती विविध प्रकारच्या विविध संस्थांनी, शासनाने ठेवलेल्या पारितोषकास पात्र ठरले आहे.जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस आयुक्त इत्यादींनी मंडळाच्या प्रथम पारितोषकास पात्र ठरवून पुढील कार्यास प्रेरणा शुभेच्छा व प्रोत्साहन दिले.


 
Top