धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित के.टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयात व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “मेरी माटी मेरा देश“ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय सेवा विभागामार्फत महाविद्यालयात पंच प्रण शपथ, सेल्फी विथ माटी, अमृत कलश व अमृत वाटिका हे विविध उपक्रम राबविण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर सर यांनी अमृत कलश यामध्ये माती टाकून केली.

यावेळी “मेरी माटी मेरा देश“ या उपक्रम विषयी आपले विचार व्यक्त करताना डॉ. मसलेकर म्हणाले की“देशांमध्ये बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन देण्यासाठी तसेच भारताच्या मातृभूमीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. सेल्फी विथ माटी या उपक्रमामध्ये संगणक शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचे एकूण 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी माती हातात घेऊन सेल्फी काढला व सेल्फी मेरी माटी या वेबसाईट वरती शेअर करून आपला सहभाग नोंदवला. तसेच आंबा,पेरू,रामफळ,अशोकाचे,अशा विविध तीस रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक , प्रा.शुभम पाटील, प्रा गवळी मॅडम, प्रा.सौं पटेल मॅडम, श्री अजय शिराळ, श्री राजाभाऊ जाधव, श्री सय्यद, श्री सुदर्शन कुलकर्णी . तसेच विद्यार्थी उपस्थित होते. व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top