धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील त्रिशरण चौक याठिकाणी पंचशिल ध्वजाचे ध्वजरोहन करून सम्राठ अशोक धम्मचक्र बहुउद्देशीय प्रतिष्ठाण व तमाम भिम सौनिकांच्या वतिने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले व त्रिशरण चौक येथिल कटावर पंचशिल ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सम्राठ अशोक धम्मचक्र बहुउद्देशिय प्रतिष्ठाणचे सचिव प्रशांत बनसोडे सामाजिक कार्यकरर्ते आप्पासाहेब सिरसाठे, विशाल शिंगाडे, संग्राम बनसोडे, यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास सोमनाथ गायकवाड, मेसा जानराव, योगेश बनसोडे, राजरत्न ओव्हाळ, नागेश शिंगाडे, नंदु झेंडे, अजय बनसोडे, बापु सिरसाटे, प्रमोद हावळे, मुकेश मोठे, अलंकार बनसोडे, प्रविण बनसोडे, पुष्पकांत माळाळे, संतोष बनसोडे, विकी गायकवाड अदि सामाजिक कार्यकर्ते तथा भिम सौनिक मोठा प्रमाणात उपस्थित होते.


 
Top