तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील आठव्या माळे दुर्गाष्टमी दिनी रविवारी (दि. 22) रोजी देविजींच्या सिंहासनावर महिषासुर मर्दीनी अलंकार महापूजा मांडण्यात आल्यानंतर होमकुंडावर वैदीक होम हवन विधी संपन्न झाला.
दुर्गाष्टमीदिनी होमकुंडावर पारंपरिक पद्धतीने वैदिक होमविधी दुपारी 3.00 वाजता यजमान जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे, दाम्पत्याच्या हस्ते होमहवनास आरंभ झाला. त्यानंतर सप्तशती, देवी भवानी सहस्रनाम्, मूलमंत्र, नवग्रह हवन होवून यजमानांच्या हस्ते कोहळ्याची पुर्णाहुती देण्यात आली. होमावरील विधीचे पौरोहित्य उपाध्ये पाठक यांच्यासह शहरातील ब्रम्हवृंदांनी केले. यावेळी विश्वस्त उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सोमनाथ माळी, लेखापाल सिध्देश्वर शिंदे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, यांच्यासह कर्मचारी, भाविक उपस्थित होते.