तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील, कामठा, अपसिंगा, तसेच वरवटी  गावसुद, वडगांव येथील ग्रामस्थांनी रात्री-बेरात्री मुक्काम न करणे, गटाने शेतकाम करणे, लहान मुलांना एकट्याने न फिरु देणे, जनावरांना बंदिस्त गोठयात अथवा निवासात बांधणे तसेच सोशल मिडीया व इतर प्रसार माध्यमाद्वारे होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवणे, बिबट सारखा वन्यप्राणी आढळल्यास त्याची प्रथमत: वनविभाग/ गावचे सरपंच/ पोलीस पाटील यांना कळवावे व अफवा पसरण्यापासून दूर रहावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी वी. ऐ. चौघुले वनपरिक्षेञ अधिकारी तुळजापूर यांनी केले आहे.

मौजे वरवटी येथे गाईच्या वासरावर हल्ला करुन मारले बाबतीची माहिती मिळताच दि. 02 ऑक्टोबर 2023 रोजी सदर कर्मचाऱ्यांसमवेत पहाणी केली असता सदरचे मृत वासराचे शरीर  दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मौजे वरवंटी ता. जि.धाराशिव येथील फॉरेस्ट्‍ गट क्र. 107 मध्ये ओढत नेऊन खाल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याही दिवशी संपूर्ण परिसरात गस्त घालण्यात आली व सायंकाळी मृत वासराचे शरिराजवळ ट्रॅप कॅमेरे लावून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.

तसेच मौजे वरवटी, कामठा, अपसिंगा, गावसुद, वडगांव व इतर गावात खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहवे तसेच पुढील संभाव्य मानवी व पाळीव प्राणी यांची होणारी जिवीत हानी टाळण्याकरिता आपण प्रशासनास सहकार्य करावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करून नका व त्याचा पाठलाग करू नका. मुख्यत्व अंधराच्या वेळी बिबट्याचा वावर असल्यामुळे मुलांना एकटे सोडू नका. मुलांना शाळेमध्ये समुहाने अथवा पालकासोबतच पाठवावे. रात्री गटा-गटाने, सोबत काठी व बँटरी घेऊनच फिरावे. बिबट्या शक्यतो रात्रीचे वेळी शिकार करतो. कोणत्याही राखीव/ संरक्षित बनामध्ये प्रवेश करू नये, तसेच जनावरे, शेळ्या-मेंढया अवैध चराईसाठी सोडू नये.

बिबट्या मानवी वस्तीमध्ये आल्यास उत्साहापोटी पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी गर्दी करु नका,

संबंधित वन खात्यात वन कर्मचाऱ्यांना कळवा व त्यांना सहकार्य करा.असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर वी.ऐ .चौगले यांनी केले आहे.


 
Top