तुळजापूर (प्रतिनिधी)-   तिर्थक्षेञ विकासासाठी   केंद्र व राज्य शासनाने 1334 कोटीची तरतूद केल्याने व शहराच्या चोहीबाजूने महामार्ग रस्ते, उपजिल्हा न्यायालय बांधकाम रेल्वेमार्ग चेन्नई सुरत ग्रीन ऐक्सप्रेस कामे चालु झाल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरवाढ वेगाने होणार आहे. यामुळे  जमिनीचे भाव गगणाला भिडणार असल्याने सध्याचा काळ हा स्थावर मालमत्ता घेण्यासाठी हा सुवर्ण काळ असल्याने हा काळ घालवला तर हाती फक्त निराशाच येईल असे मते युवा उद्योजक दिनेश अग्रवाल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.                           

यावेळी बोलताना अग्रवाल पुढे म्हणाले  तिर्थक्षेञ तुळजापूर ला केंद्र व राज्यशाषणाने विकासासाठी 1328 व रस्ते कामासाठी 150 असा 1474कोटी रुपये तरतूद केली. याचा परिणाम शहर विकासात भर पडणार आहे कोराना नंतर भाविक संखेत वाढ झाली आहे. 2013 च्या डीपी प्लँन मध्ये शहराभोवती असणाऱ्या जमिनीत खुप मोठ्या प्रमाणात ग्रीनझोन झाला आहे. त्यामुळे रहिवाशी जागा कमी झाला आहे. काँरोडोरमुळे मंदिरा भोवती होणाऱ्या संपादीत जागा  झाल्यानंतर व शहरात ट्राँफीक वाढल्या नंतर शहरातील लोक स्थलांतर करुन वाढीव हद्दीत जाण्याची शक्यता आहे. तसेच शिर्डी प्रमाणे हैद्राबाद, पुणे, मुंबई येथिल मंडळी येथे मालमत्ता गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय तुळजापूरला मानत आहेत. तसेच शक्ती पीठ ते भक्ती पीठ मार्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर जलद गतीने वाढत आहे. स्थावर मालमत्ता खरेदीसाठी हा सुवर्ण काळ असुन ही संधी घालवली तर माञ भविष्यातील वाढत्या दरामुळे निराशा राहणार आहे असे शेवटी म्हणाले.


 
Top