धाराशिव (प्रतिनिधी)-प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत शहराकडे होत असलेले स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे व स्थानिक पातळीवरच युवकांना रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावेत, याकरिता ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहेत. याचा शुभारंभ उद्या दि 19/10/2023 रोजी साय. 4.00 वा ऑनलाईन पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन रुक्मिणी मंगल कार्यालय, तेर येथे करण्यात आले आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात कौशल्यावर आधारीत शिक्षण आणि त्यातून उद्योग निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षणातून उत्पादनक्षम युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहराकडे होत असलेले स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावेत, याकरिता ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

राज्यात 500 ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारची केंद्र स्थापन करण्यात येणार असून धाराशिव जिल्ह्यातील तेर, बेंबळी, ढोकी, अणदुर, जळकोट, गुंजोटी, माकणी, शिराढोण, येरमाळा, तेरखेडा आसू व ईट अशा 12 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उद्या दिनांक दि. 19/10/2023 रोजी सायंकाळी 4.00 वा. या केंद्रांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने रुक्मिणी मंगल कार्यालय तेर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये एक रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांसाठी प्रति वर्ष रुपये 6000, लेक लाडकी योजना, महिलांना बस प्रवासात सवलत यासारख्या अनेक क्रांतिकारी निर्णया सह ग्रामपंचायत स्तरावरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.


 
Top