धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरात अतिक्रमण विरुद्ध मोहीमेमार्फत हटवावी अशी मागणी दिनांक 29/09/2023 रोजी लक्ष्मण माने यांनी मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांना दिली होती. या निवेदनाची दखल घेऊन आज नगर प्रशासनाने हि मोहिम राबविण्यात आली व अतिक्रमणे हटवली.
धाराशिव शहरात बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी चौक ते नगर पालिका या दरम्यान अतिक्रमण वाढले होते. तसेच अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आले होते. हे अतिक्रमण आणि अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. बस स्थानकासमोर फुल स्टॉल फळफळावळ दुकाने, फेरीवाले, चहा - पान टपऱ्या यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.