तुळजापूर (प्रतिनिधी)- महानवमीदिनी सोमवार (दि. 23) दुपारी 12 वाजता होम कुंडावर अजाबळी देण्यात घटोत्थापन (घट उठवणे) करण्यात  आले. महानवमीदिनी पहाटे एक वाजता चरणतीर्थ होवून धर्मदर्शनास प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी पाच वाजता देविजीस भाविकांचे  अभिषेक करण्यात आले. त्यानंतर सिदफळ (ता. तुळजापूर) लांडगे यांनी दिलेला अजाबळीचा मिरवणूकीने मंदिरात आणण्यात आल्यानंतर आरती करण्यात येवुन अंगारा काढण्यात आला. दुपारी बारा वाजता होम कुंडावर जीवन वाघमारे यांच्या हस्ते अजाबळी देण्यात आली. 

याप्रसंगी महंत भोपे  पाळीचे पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी डाँनिलेश देशमुख, उपविभागीय अधिकारी योगेश खैरमाटे, तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन  सोमनाथ माळी वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले सह भोपे पुजारी, सेवकरी, मानकरी, भाविक आदींची उपस्थिती होती. यानंतर मंदिर समितीच्या वतीने यांनी अजाबळी देणारे जीवन वाघमारे व बकरा देणाऱ्या  लांडगे यांचा भरपेहराव आहेर देवून यथोचित सन्मान केला. आज 

दर्शनासाठी राज्यभरातील देवीभक्तांनी मोठी गर्दी केली होती.


 
Top