धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा एस.एस.आर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद बेंगलोर (नॅक) यांचेकडे यशस्वीपणे सादर करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की, आपण नेहमी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अध्यापनाबरोबरच इतर वेगवेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थ्याचे कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घडविलेले करिअर हीच आपल्या कामाची पोच पावती असते. महाविद्यालय विद्यापीठाच्या, महाराष्ट्र शासनाच्या आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेगवेगळ्या तपासण्यांना नेहमी सामोरे जाते.त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालय भारतीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) च्या तपासणीसाठी सामोरे जात आहे. महाविद्यालयातील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता प्रामाणिकपणे कार्य करतो यावर माझा ठाम विश्वास आहे. गुरुदेव कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाला नक्कीच यश मिळेल अशी अपेक्षा आहे असे यावेळी ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थित सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी अभिनंदन केले व एस एस आर यशस्वीपणे सादर झाला याबद्दल महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांचे वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

याप्रसंगी नॅचे समन्वयक प्रा.डॉ. एस एस फुलसागर ' नॅक चे सहसमन्वयक डॉ. संदीप देशमुख, सर्व गुरुदेव कार्यकर्ते,प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.


 
Top