धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील आज सर्व निरीक्षक व समन्वयक, सुपर वॉरियर यांची बैठक घेण्यात आली. 

सदरील बैठकीस संबोधित करताना प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर म्हणाले की, गावागावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम भारतीय जनता पार्टीतच केले जाते. यापुढेही सामान्य कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे पक्षकार्य पाहून दिली जातील असेही त्यांनी सांगितले.

संघटन मंत्री संजय कौडगे यांनी बूथ संघटन अधिक मजबूत करून आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील याचे नियोजन करावे असे आवाहन केले.

बैठकीत मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किरण पाटील, जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य, तुकाराम गोरे, सुधीर  पाटील, ॲड. अनिल काळे ॲड. व्यंकटराव गुंड, सतिश दंडनाईक, बसवराज मंगरूळे,अस्मिता कांबळे, नेताजी पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, सतिश देशमुख, गुलचंद व्यवहारे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील  सर्व निरीक्षक व समन्वयक/सुपर वॉरियर यांचीही आज बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीत देखील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी पक्षाला नंबर वन ठेवण्याचा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला. यावेळी स्थानिक पदाधिकारी तसेच मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top