धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये इ.5 वी विभागात प्रतिवर्षा प्रमाणे दिपावली निमित्त प्रथमसत्र परिक्षेपूर्वी आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 220 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला कार्यानुभव शिक्षीका सौ.पी.डी. परतापुरे, कलाध्यापक शेषनाथ वाघ यांच्या परिक्षणाने अनुक्रमे 4 क्रमांक निवडण्यात आले.
प्रथम क्रमांक ऋषीकेश बालाजी सुपुते 5 व, द्वितीय क्रमांक आयुष विशाल येळवे तुकडी ड, तृतीय क्रमांक अंकिता लुकेश चव्हाण तु. ई, उत्तेजनार्थ वैष्णवी नाना क्षिरसागर या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, इ. 5 वीचे पर्यवेक्षक डी.ए . देशमुख, इ. 6वीचे पर्यवेक्षक के.वाय. गायकवाड, 7 वीचे पर्यवेक्षक आर .बी. जाधव यांच्या हस्ते पॅड पेन देऊन सत्कारीत करण्यात आले. त्याच बरोबर आकर्षक 24 आकाश कंदील तयार केलेल्या विद्यार्ध्यांना सुध्दा पॅड पेन देण्यात आले. सदर स्पर्धेसाठी डी.व्ही. ओव्हाळ, एस.एस.मोहिते, ए.आर. बोपलकर, सौ.एस. व्ही. लोकरे, एस. डी .बीरगड, एस.एम. राऊत,एस.डी.गायकवाड, एम.पी. पवार या शिक्षीकांनी परिक्षम घेतले.