धाराशिव (प्रतिनिधी)-नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- 2023 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे  सोलापुर विभाग, सोलापूर ते नागपूर आणि  नागपुर- पुणे  या एकेरी  विशेष गाड्या विशेष शुल्कावर चालवणार आहे. 

गाड़ी क्र.01 029 सोलापूर - नागपूर वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस  दिनांक 24.10.2022 रोजी सोलापूरहून 20.20 वाजता निघेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी 13.05 वाजता पोहोचेल.थांबे: कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.  रचना:  22 जनरल, सेकंड क्लास दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह (एकूण = 24  ICF कोच). गाड़ी क्र. 01030 नागपूर-पुणे वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी दिनांक 24.10.2022 रोजी नागपूरहून 23.00 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 17.45 वाजता पोहोचेल. थांबे:  अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड चोर मार्ग. रचना: एक एसी- 2-टायर,  दोन एसी 3-टायर,  13 स्लीपर क्लास, 6 जनरल, सेकंड क्लास दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह (एकूण = 24 ICF कोच).


कोल्हापूर-नागपूर नियमित करा

गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर-नागपूर व हैद्राबाद -हडपसर या दोन्ही रेल्वे नियमित करण्यासाठी हजारो रेल्वे प्रवाशांची मागणी असून सुध्दा या दोन्ही रेल्वे नियमित केल्या जात नाहीत.  नुकतेच पुण्यामध्ये क्षेत्रीय खासदारांची विभागीय बैठक 14 ऑक्टोबर रोजी झाली. या बैठकीमध्ये ही खासदारांनी या दोन्ही रेल्वे नियमित करण्याची मागणी केली आहे. 


 
Top