धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील एका हॉटेल व्यावसायिकास जुन 2023 रोजी सायबर गुन्हेगारांनी तब्बल सहा लाख रुपयांचा गंडा घातला होता. याचा तपास धाराशिव सायबर पोलिस विभागाने करून त्यापैकी 5 लाख 18 हजार रूपये फिर्यादीस मिळवून दिले आहेत. उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी सायबर विभागाचा अद्याप तपास चालू आहे अशी माहिती पोलिस सुत्राने 19 ऑक्टोबर रोजी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहारातील एका हॉटेल व्यावसायिक यास सायबर भामट्यांनी आर्मी ऑफीसर असल्याचे भासवून रुम बुक करण्याचे बहाण्यावरुन ऑनलाईन पैसे पाठवणे कामी आमची आर्मीची प्रोसिजर वेगळी आहे असे सांगून एक पेटीएम ची लिंक सेंड केली. सदर लिंक वर जावून फिर्यादी यास बॅकेची माहिती टाकल्यावर आपले पैसे मिळतील असे सांगून बनावट लिंक द्ववारे सदर आरोपीतांने तब्बल 6,98,000 रूपये फिर्यादी यांचे खातेवरुन काढून ऑनलाईन फसवणूक केली होती.

सदर फिर्यादीच्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोनि बी. एस. वाकडकर हे करत असुन त्यांना तपासामध्ये तांत्रिक विश्लेषन मदती करीता सपोनि सचिन पंडीत, पोउपनि श्रीमती ए.आर. जाधव, पोलीस हवालदार गणेश. डी.जाधव, पोलीस अमंलदार शशीकांत हजारे, पोलीस अमंलदार प्रकाश भोसले, पोलीस हवालदार अनिल भोसले  यांनी तपास केला. या तपासादरम्यान फिर्यादी यांची फसवणुक झालेल्या रक्कमपैकी 5,18,000 रूपये हे फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास अद्याप सुरु आहे.

तरी सायबर पोलीस स्टेशन धाराशिव यांचे वतीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नये. तसेच आपला खाते क्रमांक, ओटीपी किंवा इतर वैयक्तीक माहिती आनोळखी लिंक ओपन करु नये. क्रमांक. संशय वाटल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.


 
Top