धाराशिव (प्रतिनिधी)-  कळंब तालुक्यातील येरमाळा येथे नवरात्रनिमित्त येडेश्वरी मंदिर येथे पाचव्या माळीनिमित्त गुरुवारी (दि.19) संजय पाटील दुधगावकर मित्र परिवाराच्या वतीने भाविकांना शंभर किलो फराळाचे लाडू वाटप करण्यात आले. 

मागील दहा वर्षापासून ही परंपरा त्यांनी आजही कायम ठेवली आहे. यावेळी संजय पाटील दुधगावकर, सुधीर लोंढे, दत्तप्रसाद डाळे, राजाभाऊ निचळे, तानाजी बारकुल, दत्ता डाळे, गणेश पलंगे, बालाजी बारकुल, संतोष बारकुल, तुषार बारकुल, अमरजीत बारकुल, बापूसाहेब बेंदरे, समाधान बेंदरे आदींची उपस्थिती होती.

 

 
Top