धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 1 आँक्टोंबर रोजी स्वच्छता हीच समाजसेवा हे अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. 

या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगताना प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की, आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रत्येकाने आपली घरे, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. संपूर्ण देश स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी असणे हे जबाबदार नागरिकांचे एक महत्त्वाची कर्तव्य आहे. सुदृढ, सक्षम, स्वच्छ आणि निरोगी भारताच्या निर्माणसाठी प्रत्येकाने स्वच्छता अभियानात कृतीयुक्त सहभागी घेतला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.   

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्रसेना विभाग यांच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात तसेच शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, आरोग्य विभाग आदी परिसरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी ज्युनिअर विभागाचे प्रमुख प्रा. सूर्यवंशी, नॅक समन्वयक डॉ. फुलसागर, सह समन्वयक डॉ. संदीप देशमुख, य.च. मुक्त विद्यापीठाचे समन्वयक डॉ. डी. एम. शिंदे, एनसीसी विभाग प्रमुख डॉ. केशव क्षीरसागर, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. माधव उगीले, प्रा. मोहन राठोड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top