नळदुर्ग (प्रतिनिधी)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या “मन की बात“ या कार्यक्रमामध्ये दि.1 ऑक्टोबर रोजी देशांतील विविध ऐतिहासिक स्थळे, नदी आणि अमृतसरोवर याठिकाणी एक तास श्रमदानाच्या माध्यमातुन स्वच्छता करण्याचे देशवासियांना आवाहन केले होते. याला नळदुर्ग शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दि.1 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह नगरपालिका, शहरांतील सर्व पक्षिय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पत्रकारांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन किल्ला परीसर स्वच्छ केला.

1 ऑक्टोबर 2023 रोजी “एक तारीख एक घंटा“ या उपक्रमाअंतर्गत सकाळी 10 वा. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात आमदार राणा जगजितसिंह पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जि. प.सदस्य ॲड. दीपक आलुरे, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, माजी नगरसेवक संजय बताले, निरंजन राठोड, किशोर नळदुर्गकर,संजय विठ्ठल जाधव,अबुअलहसन रजवी, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, सुनिल बनसोडे, संतोष पुदाले,लतिफ शेख, दादासाहेब बनसोडे सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, न.प.चे कार्यालयीन अधिक्षक अजय काकडे, सुरज गायकवाड, नगरअभियंता वैभव चिंचोले, खंडू शिंदे, मुश्ताक पटेल, अंबादास व्हगाडे, ज्योती बचाटे, शहाजी येडगे, पप्पु खारवे, आनंद खारवे यांच्यासह नगरपालिकेचे सर्व स्वच्छता विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी किल्ला पार्कींग परीसर,अंबर खाना व उपल्या बुरुज परीसरात स्वच्छता अभियान राबवुन हा परीसर स्वच्छ करण्यात आला.

यानंतर नगरपालिकेच्या वतीने किल्ला गेट ते मराठा गल्ली येथील गणपती विसर्जन घाटापर्यंत स्वच्छता अभियान राबवुन हा परीसर स्वच्छ करून घेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हातात झाडू घेऊन उपस्थित होते.


 
Top