धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील दारफळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन सरपंच तथा युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये ई घंटागाडी द्वारे गावातील कचऱ्याची विल्हेवाट सुयोग्य पद्धतीने लावता येणार आहे. त्यासाठी नागरिकांना डस्टबिन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच आर ओ प्लांट ची देखील या ठिकाणी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य आरोग्य धोक्यात येणार नाही. त्याचबरोबरीने नागरिकांसाठी सोलार हॉट वॉटर प्लांट द्वारे अंघोळीसाठी गरम पाण्याची देखील व्यवस्था करुन देण्यात आली आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती ओव्हाळ,संदीपान ओव्हाळ, प्रकाश घुटे,तेजस भोरे, पोपट ओव्हाळ,भैरवनाथ इंगळे, बळीराम भोरे, विलास ओव्हाळ, रविराज ओव्हाळ, सुनील इंगळे, आबा ओव्हाळ, अनंत भालेराव, यशपाल ओव्हाळ, नितीन ओव्हाळ, ग्रामपंचायत सेवक समाधान ओव्हाळ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top