नळदुर्ग (प्रतिनिधी) नळदुर्ग येथील शिवाजी गायकवाड यांची लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
शिवाजी गायकवाड हे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्य म्हणुन काम करीत असतांना त्यांनी मातंग समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.लहुजी शक्ती सेनेचे स्व. सोमनाथ कांबळे यांच्या सोबत शिवाजी गायकवाड यांनी लहुजी शक्ती सेनेत 15 ते 16 वर्षे काम केले आहे.राज्यांतील अनेक ठिकाणी मातंग समाजाच्या मागण्यांसाठी शिवाजी गायकवाड यांनी आंदोलने केली आहेत.यावेळी अनेकदा पोलिसांनी लाठीमार केले अनेकदा त्यांना जेलमध्ये जावे लागले मात्र शिवाजी गायकवाड यांनी याला न डगमगता आपले काम चालुच ठेवले.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी शिवाजी गायकवाड यांनी लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.शिवाजी गायकवाड यांच्या या निवडीचे नळदुर्ग शहरात जोरदार स्वागत करण्यात आले आहे.