धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे - पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे. धाराशिव येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.

मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे - पाटील यांनी शासनाला दिलेली मुदत संपल्याने त्यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा अमरण उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे - पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे. आज या साखळी उपोषणाचा सहावा दिवस आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव अनेक वर्षा पासून न्याय हक्कांसाठी लढत आहे. आत्तापर्यंत शांततेच्या मार्गाने कसे आंदोलन करावे हे मराठा समाजाने दाखवून दिले आहे.

धाराशिव येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने या उपोषण पाठिंबा देण्यात आला. याबाबतचे पत्र आज उपोषणकर्त्यांना देण्यात आले. यावेळी ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top