नळदुर्ग (प्रतिनिधी)- आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नळदुर्ग शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने दि.30 ऑक्टोबर पासुन साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर आरक्षण मिळेपर्यंत आजी माजी मंत्री, खासदार व आमदारांना शहरबंदीही करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणापत्र देण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठींबा देण्यासाठी नळदुर्ग येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवनेरी चौकात दि.30 ऑक्टोबर पासुन  साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला शहरांतील विविध संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने पाठींबा देण्यात आला आहे. 

सकल मराठा समाजाचे तानाजी जाधव, शरद बागल,संजय दशरथ जाधव, राजेंद्र काशिद, शिवाजी धुमाळ, आबाजी जाधव, संतोष मुळे, वैभव पाटील, अंबादास पवार, अभय जाधव, रमेश जाधव, बबन चौधरी, शिवाजी सुरवसे, नेताजी किल्लेदार, बाळासाहेब जाधव, आशिष जगदाळे, प्रशांत चव्हाण, सहदेव जगताप, विनोद जाधव, बालाजी मोरे, भगवंत सुरवसे, आकाश काळे, गणेश शिंदे, रातिकांत नागणे, विशाल मोटे, बंटी मुळे,ऋषिकेश ढोणे यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

प्रारंभी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यानंतर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.माजी नगराध्यक्ष नितीन कासार, दत्तात्रय दासकर, माजी नगरसेवक शफीभाई शेख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, भाजपाच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर,भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, शहर भाजप अध्यक्ष धीमाजी घुगे, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके,अक्षय भोई, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,सागर हजारे, विशाल डुकरे यांनी उपोषणस्थळी जाऊन मराठा समाजाने सुरू केलेल्या साखळी उपोषणास पाठिंबा दिला.


 
Top