वाशी (प्रतिनिधी)- आज दि 29 रोजी वाशी येथील सकल मराठा समाजातील महिलांनी साखळी उपोषणात सहभाग घेतल्याने  आंदोलनास धार आली. महिलांनी मोठ्या संख्येने  सहभाग घेऊन एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, या दणदणीत घोषणा देऊन आम्हीही आंदोलनात सहभागी आहोत हे दाखवून दिले.दिवसभर महिलांनी साखळी सुरू ठेवली , महिलांच्या उत्स्फृत सहभागामुळे वाशीकर  अचंबित झाले.


 
Top