वाशी (प्रतिनिधी)- दि.29 ऑक्टोबर रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वाशी तालक्यातील इंदापूर येथील संजय दत्तू पारडे या कुणबी शेतकऱ्यांने बैल गाडी घेवून अन्नत्याग करत इंदापूर ते अंतरवाली सराटी ला मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत. या मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

गावोगावचे शेतकरी रस्त्यावर उतरले असून, नेत्यांना गाव बंदी करण्यात येवून, साखळी उपोषण नंतर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.सदर शेतकऱ्याचे गावोगावी स्वागत करण्यात येत आहे. आरक्षण मागणीचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.आरक्षण देण्यास सरकारने अंत पाहू नये पोलीस ठाणे वाशी येथे बैल गाडी मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. आरक्षण देण्यास सरकारने अंत पाहू नये अशा भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.


 
Top