धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब व रोटरी सेवा ट्रस्ट, उस्मानाबाद यांचे वतीने आयुष्यातील एक पाऊल देईल मृत्यूला हूल हा कार्यक्रम दिनांक 5 नोव्हेंबर 2023, रविवार रोजी सकाळी 10.30 वाजता, परिमल मंगल कार्यालय, धाराशिव येथे, नाशिक येथील सुप्रसिद्ध वक्ते व डॉ. श्री. हितेंद्र महाजन यांचे प्रेरणात्मक विचार देणारे व्याख्यान विद्यार्थी, पालक, व्यवसायिक, शिक्षक महिला यांचेसाठी ठेवण्यात आले आहे.

दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्व, तणाव मुक्ती व ह्रदय विकाराच्या झटक्याचे आपत्कालीन व्यवस्थापन अशा अतिशय महत्वपूर्ण विषयावर त्यांचे सविस्तर विवेचन होणार आहे.  त्यांनी स्वत: एव्हरेस्ट एक्सपेडिशन, अमेरिकेतील रन अक्रॉस अमेरिका, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड इन सायकलिंग, अशा अत्यंत आव्हानात्मक मोहीमा अनेक वेळा पार पाडल्या आहेत.  आधी केले आणि मग सांगितले या प्रमाणे त्यांचे अनुभवाचे बोल तरुण पिढीसाठी खूप उपयोगी असतील.  रोटरी क्लब उस्मानाबाद कडून सदरील कार्यक्रम सर्वांसाठी पुर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. तरी सदरील कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे रोटरी क्लब उस्मानाबाद कडून आवाहन करण्यात आले आहे.


 
Top