धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, फ्लाईंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश, धाराशिव या शाळेने वाढते प्रदूषण, वाढते औद्योगिकीकरण पाहता होणारे प्रदूषण जसे, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण पाहता हातलाई देवी मंदिर परिसरातील तलावाच्या काठावर वाढलेला कचरा, घाण साफ करण्याचा निर्णय घेतला व तलावाच्या काठावर साचलेले घाण व कचरा साफ आहे. कचऱ्यात प्लास्टिक, खराब कपडे, निकामी साहित्ये, अनेक टाकाऊ वस्तू अश्या गोष्टी आढळल्या.  प्राचार्य  चंद्रमणी चतुर्वेदी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण व संवर्धन या बाबीवर मार्गदर्शन केले. वर्तमान काळात पाण्याची गरज व पाणी टंचाई याची जाण सर्वांना करून देत 'पाणी पाणी वाचावा व पाण्याच्या काटकसरीने वापर करा' असे सांगत सर्वांनाच वर्तमान परिस्थितीची जाण करून दिली व 'स्वच्छता ही ईश्वर सेवा असून स्वच्छता करणे हा आपणा सर्वांचा हक्क आहे' असे सांगत प्राचार्यांनी सर्वांना संबोधित केले. या उपक्रमाद्वारे तब्बल 250 किलोग्राम इतका कचरा गोळा झाला असून, गोळा झालेला कचरा ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून योग्य विल्हेवाट लावण्यात आले. 

सदरील उपक्रमात प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी व समस्त शिक्षक - शिक्षिका वर्ग, कर्मचारी वर्ग व त्याचप्रमाणे जवळपास 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यासाठी समस्त फ्लाईंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूल परिवाराचे योगदान लाभले असून, फ्लाईंग किड्सचे क्रिडा शिक्षक  इंद्रजीत वाले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पाडण्यात आला. या उल्लेखनीय कार्याचे सार्वत्रिक वाह! वाह! होत असून, हा उपक्रम सर्वांना प्रेरणादायी ठरला आहे.


 
Top