धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड. इंद्रजित चिंतामणराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या आदेशाने ॲड. इंद्रजित शिंदे यांची निवड करण्यात आली असून मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात ॲड.इंद्रजित शिंदे यांना नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ॲड.शिंदे यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांनी सामाजिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.शोषित, पीडित सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी ॲड.शिंदे म्हणाले की,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करुन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणार असून वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणार आहे.


 
Top