धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) जिल्हा कार्यालय धाराशिव येथे  प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या प्रमुख उपस्थिती व  युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे तसेच युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. 

धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष पाटील, धाराशिव जिल्हा संघटक सुदर्शन करंजकर,धाराशिव तालुकाध्यक्षपदी बालाजी शिंदे, तुळजापूर तालुकाध्यक्ष नितीन रोचकरी,परंडा तालुकाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, भूम तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ, वाशी तालुकाध्यक्ष अविनाश काटवटे, तुळजापूर शहराध्यक्ष शशी नवले, परंडा तालुका कार्याध्यक्ष लहू डाकवाले व दाऊद शेख, भूम तालुका कार्याध्यक्ष संदीप गटकळ, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष समाधान ढोले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी वेळी नियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे, सामाजिक न्याय सेल जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, खलील पठाण, महेश नलावडे, विराट पाटील, केशेगाव जि प गटप्रमुख लिंबराज लोखंडे, गोविंद देवकर, अभय माने, प्रतीक माने, सागर गाढवे, संदीप बनसोडे, गणेश गुरव, धनंजय मस्के, विश्वनाथ बागल  आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top