धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथे दि.01 आक्टोंबर 2023 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

सांगवी (काटी) येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 715 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 100 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच अमोल पाटील, ग्रा.प. सदस्य उमेश मगर, नामदेव बनसोडे, राधा मगर, विश्वास मगर, भिमा भुईरकर, संतोष मगर, मा. सरपंच कालीदास मगर, दिलीप मगर, रघुनाथ मगर, महादेव माळी, रवि मगर, विजया मगर, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक वेताळे सर, चौधरी सर, जाधव सर तसेच अंगनवाडी सेविका सुनंदा गुंड  पुष्पा मगर, शामल रोकडे, पुजा मगर प्रा. आरोग्य केंद्र सावरगाव च्या  आशा कार्यकर्त्या अर्चना मगर निलावती माळी इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. अभिजीत यादव, डॉ. प्रज्वल उखळीकर, डॉ.कपील डोंगरे, डॉ. शिवम येवारे, डॉ. विजय बोराडे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top