नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील व्यासनगर येथे माऊली महिला भजनी मंडळ, पारायण समिती व श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापक मंडळ नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात येणार आहे.या पारायण  सोहळ्याची सुरुवात दि.29 ऑक्टोबर रोजी माऊलींची पुजा करून करण्यात आली.

सालाबादप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथील व्यासनगर येथे वै. गुरुवर्य तात्यासाहेब वासकर (आबा) यांच्या कृपाशीर्वादाने व श्री सद्गुरू शिवराम बुवा दिंडेगावकर यांच्या आशिर्वादाने तसेच वै. ह. भ. प.मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने दि.29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

पारायण कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 6 ते 7 माऊलीची पुजा,7 ते 9 ज्ञानेश्वरी वाचन,9 ते 9.30 विश्रांती,9.30 ते 11 वाचन,11 ते 12 भोजन, विश्रांती, दुपारी 12 ते 4 गाथा भजन व महिला भजन,4.30 ते 5.30 प्रवचन,5.30 ते 6 नामजप,6 ते 7 हरीपाठ,7 ते 8 भोजन, रात्री 9 ते 11 कीर्तन, रात्री 12 ते पहाटे 4 हरीजागर असे कार्यक्रम होणार आहेत.

पारायण कालावधीत ह.भ. प.बली महाराज चिकुंद्रा, ह.भ.प.संजय पवार महाराज शहापुर, ह.भ.प.तात्या महाराज सलगरा, ह.भ.प.मोहन पाटील किलज, ह.भ. प.कृष्णाथ जाधव, ह.भ. प.राजु पाटील वागदरी यांचे प्रवचन होणार आहे तर ह.भ. श्रीहरी ढेरे महाराज, ह.भ.प.विश्वनाथ गरजे महाराज, ह.भ.प. प्रल्हाद सरडे महाराज, नांदुरी, ह.भ. प.लक्ष्मण महाराज सोलापुर, ह.भ. प.गुरुवर्य विठ्ठल महाराज वासकर, ह.भ. प.राम महाराज चिकुंद्रा यांचे कीर्तन होणार आहे.

दि.4 नोव्हेंबर रोजी ह.भ. प.महेश महाराज कानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे तर गुरुवर्य आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते काला वाटप होणार आहे. दि.4 नोव्हेंबर रोजी श्री शिवाजीराव नारायणराव वऱ्हाडे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.हा पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठीकमलाबाई सुरवसे, श्रीमती माने बाई, रेखा वऱ्हाडे, माजी नगरसेविका सुमन जाधव, मिनाक्षी काळे, मंगल गायकवाड, अधिष्ठान कदम, शिवाजीराव वऱ्हाडे व राम गायकवाड हे परीश्रम घेत आहेत.

दि.3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा. दीपोत्सव समारंभ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन माऊली महिला भजनी मंडळ, पारायण समिती व श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापन मंडळ नळदुर्ग यांनी केले आहे.


 
Top