धाराशिव (प्रतिनिधी)-मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधी स्थळी आखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांची आक्रोश सभा बुधवार, 1 नोव्हेंबर रोजी शिवली (ता.औसा) येथे होणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी  सर्व जाती धर्माच्या लोकांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.

स्व.आण्णासाहेब जावळे पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी, मराठा समाजाची होत असलेली फरफट थांबण्यासाठी, मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरीत आरक्षण नसल्याने समाज दयनीय अवस्थेमध्ये कशा प्रकारे जगत आहे याला वाचा फोडण्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकरने मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून मंत्रालयावर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याकरिता मराठा आक्रोश सभेचे आयोजन छावा संघटनेने केले आहे. या सभेला नानासाहेब जावळे पाटील हे संबोधित करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री.साळुंके यांनी दिली आहे.


 
Top