भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात निपाणी येथे मराठा आरक्षणाचा पहिला बळी प्रवीण काकासाहेब घोडके (वय 38 वर्षे) याच्या माध्यमातून गेला आहे. या युवकाने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलल्याने त्याचा निष्पाप जीव गेला. मात्र सर्व सकल समाज बांधवांमधून महाराष्ट्र शासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे.

 मराठा समाजाला आरक्षणाची मोठी आज लागून राहिलेली आहे. आरक्षण मिळाले तर येणाऱ्या पिढीची प्रगती होईल यासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भावना मराठा समाज बांधवांची आहे. मराठा समाजाला आरक्षण हे आजच्या काळाची गरज बनलेली आहे. मात्र महाराष्ट्र शासन कायम मराठा समाज बांधवांना झुरत ठेवण्याचे काम करत आहे. भुम तालुक्यातील निपाणी येथे मराठा आरक्षणाचा पहिला बळी प्रवीण काकासाहेब घोडके (38) या युवकाने मराठा आरक्षण मिळावे म्हणुन निपाणी येथे स्वत:च्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जिवन संपवले. प्रवीण हा मराठा आरक्षणाच्या चळवळीतील सक्रिय सदस्य होता. आत्महत्या केल्यानंतर त्याच्या खिशात एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा असा मजकुर लिहिलेली चिठ्ठी सापडली असल्याची माहीती निकटवर्तीयांनी दिली. प्रवीणच्या पाश्चात्य पत्नी, एक मुलगा, दोन मुली, वडील असा परिवार आहे.  या घटनेमुळे प्रवीण घोडके याची तीन अपत्य कायमची पोरगी झाली. तसेच आई-वडिलांचाही म्हातारपणीचा आधार कायमचा संपला. तीन मुले आणि सासू-सासरे यांचा सांभाळ कसा करायचा हाच जन्मभराचा प्रश्न प्रवीण याच्या पत्नीसमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.


भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकांनी टावरवर चढवून आंदोलन चालू केले आहे. यामध्ये युवकांनी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे आंदोलन पाठीमागे घेणार नाही अशी भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. इट या ठिकाणीही सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण चालू केले आहे. वालवड या ठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात आला.


 
Top