नळदुर्ग (प्रतिनिधी) - नळदुर्ग: आई राजा उदो उदो, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देत देवी भक्तांनी मोठ्या उत्साहात येथील ऐतिहासिक सिमोल्लंगन सोहळा मिरवणूक शांततेत पार पडली. नळदुर्ग चे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबाबाई मंदीरातून मंगळवार दि. 24 रोजी सायंकाळी 6.30 वाजता देवीची मुर्ती हारांनी सजवलेल्या पालखीत ठेऊन मुख्य सिमोलंगन सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. या वेळी या मिरवणुकीत पोतधारी महिला, आरादी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, ही मिरवणूक शास्त्री चौकात आल्यानंतर महिला भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती, त्यानंतर बाजारपेठ मार्गाने बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या मैदानात सिमोल्लघंन सोहळा पार पडला.यावेळी भाविकांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. या वेळी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मंदिर समिती कडून शोभेचे दारूकाम करण्यात आले होते.
शारदीय नवराञ निमित्त येथील आंबाबाई मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अनेक भाविकांनी उत्सव काळात प्रसाद वाटप केला. मंगळवारी सकाळपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पाचनंतर माञ दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी शहरातील आबालवृद्धासह तरूणांनी मोठी गर्दी केली होती. आराधी महिलांनी हाती पेटती पोत घेतली होती. तसेच यावेळी पारंपारिक वाद्यासह मिरवणूक निघाली. ही मिरवणूक शास्ञी चौक मार्गे भवानी नगर येथे आल्यानंतर पालखीवर सोने(आपट्याची पानं) उधळण्यात आले. यानंतर नागरिकांनी सोने वाटत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
_______________________________
दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंदिरात देवीचे दर्शन घेतले व या गोरगरीबांची होणारी लग्न व सभागृहाची अपूरी जागा पाहता 30 लाख रूपये निधी देणार असल्याचे जाहीर केले.
___________________________________
राष्ट्रवादी काग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे हे ही मिरवणूकीत सहभागी झाले होते. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनी स्वप्निल लोखंडे यांनी पोलिस ताफ्यासह बंदोबस्त ठेवला होता.