उमरगा (प्रतिनिधी)-मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठयांना सगरगट ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारपासून उमरगा व गुंजोटी येथे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यात आला. तर मनसेचे शेतकरी सेना जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. या उपोषणस्थळी सर्वपक्षीय विद्यमान खासदार व आमदारांना बंदी घालण्यात आली आहे.

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठयांना सगरगट ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (दि.25) पासुन उमरगा तहसील कार्यालयासमोर  साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी किरण गायकवाड, मनोज जाधव, आण्णासाहेब पवार, मंगेश भोसले, दिलीप बिराजदार हे पाच समाजबांधव उपोषणासाठी बसले होते. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक गुंजोटी येथे विक्रम माने, दिलीप चौगुले, सुनीता चंद्रकांत जाधव, अनिता विठ्ठल साळुके, शीतल सुनील पाटील, स्नेहा किसन पाटील, उलका गुंडू चव्हाण, विश्रांती सत्यप्रकाश शिंदे, विजया जीवन चव्हाण हे 9 मराठा योध्दे उपोषणात सहभागी झाले. उमरगा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषस्थळी शांतकुमार मोरे, बाळासाहेब माने, शहाजी पाटील, व्ही. एम. पाटील, संजय पवार, बाबुराव शहापूरे, शरद पवार, चंद्रशेखर पवार, विवेक हराळकर, योगेश तपसाळे, सचिन जाधव, अनिल बिराजदार, शरद माने, आरुण जगताप, लक्ष्मण शिंदे, विशाल माने, आर. सी. पाटील, शाहुराज माने, विनोद कोराळे, भूमिपुत्र वाघ, सतीश पवार, अभिषेक औरादे, प्रविण कोराळे, विक्रम शहापूरे, अजित चौधरी, रेखाताई सुर्यवंशी, सुनंदा माने, मिरा चव्हाण, लता भोसले, संध्या शिंदे आदीसह विविध मराठा बांधव उपस्थित होते. 


 
Top