नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग पोलिसांनी दि.22 ऑक्टोबरच्या पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग तुळजापुर रस्त्यांवरील नळदुर्ग जवळील गोलाई चौकात धाडसी कारवाई करीत तब्बल 18 लाख रुपये किमतीच्या गुटख्यासह 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्याच दिवशी गंधोरा गावच्या हद्दीत नळदुर्ग तुळजापूर रोडवर सह्याद्री हॉटेल समोर कारवाई करीत 3,97,200 रूपये किंमतीच्या गुटख्यासह 5,97,200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकाच दिवशी लाखो रूपयांचा गुटखा जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दि.22 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी करीत असताना पोलिसांनी संशयावरून टीएस 12 युडी 9273 या वाहनाची तपासणी करण्यासाठी हे वाहन थांबविले. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केल्यानंतर यामध्ये गोवा 1000 चे 45 पोते (गुटखा) मिळुन आले. याची किंमत 18 लाख रुपये असुन गुटखा व वाहनासह एकुण 26 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी पदभार स्विकारल्यापासून अवैध धंद्याविरूध्द कडक मोहिम चालू केली आहे.
गंधोरा हद्दीत ही गुटखा जप्त
गंधोरा गावाचे हद्दीत नळदुर्ग तुळजापूर रोडवर सह्याद्री हॉटेल समोर एका वाहना मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा आहे अशी खात्री लायक बातमी मिळाली. नळदुर्ग पो ठाणेचे पथकाने सदर ठिकाणी जावून नमुद वाहन क्र एमएच 44 यु 2405 छोटा दोस्त गाडी चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील आरोपी जावेद जब्बार मोमीन, रा.बार्शी नाका इमीमपुररोड बीड, कट्टू नजिर शेख, रा. बार्शी नाका इमीमपुररोड बीड, याचे ताब्यात नमुद वाहनात हिरा पान मसाला एकुण 21 पोते, तंबाखु 10 पोते मिळून आले. अंदाजे 3,97,200 रूपये किंमतीचा मालासह छोटा दोस्त वाहन अंदाजे 2,00,000 रूपये किंमतीचा असा एकुण 5,97,200 रूपये किंमतीचा माल मिळून आला. यांचे विरुध्द पोलीस ठाणे नळदुर्ग येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक झराड करत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कांवत व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, सुरज देवकर, पोलिस उपनिरीक्षक झिरवाळ, नितीन शिंदे, दत्ता कुंभार, अमर जाधव, अविनाश दांडेकर, दामोदर दराडे व शंकर कांबळे या पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरीकांमधुन स्वागत होत आहे. पोलिसांनी वारंवार अशा प्रकारची कारवाई करून राष्ट्रीय महामार्गावरून होत असलेली गुटखा तस्करी मोडुन काढणे गरजेचे आहे.