तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे राज्य शासनाकडून मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून तेर येथे 29 आक्टोबरला सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या कँडल मार्चला सुरुवात करण्यात आली. हा कॅडल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, जुनी  ग्रामपंचायत, नृसिंह वेस मार्गे अहिल्याबाई होळकर चौकात या कँडल मार्चची सांगता झाली. यावेळी सकल मराठा समाज व धनगर समाजातील तरूण सहभागी झाले होते.


 
Top