शिराढोण (प्रतिनिधी)-येथील ग्रामदैवत हजरत खाजा नासिरुद्दीन बाबा यांचा उर्जा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हजरत खाजा नसिरुद्दीन बाबा यांच्या उरुसाचा कार्यक्रम संदल घोड्यांच्या मिरवणुकीने गुरुवारी (ता.5) रोजी शिराढोण पोलीस ठाण्याच्या वतीने विधीवत पूजन आणि कुरान पठन करून संदल चढवण्याचा कार्यक्रम सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणराव नेहरकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून चिरागा शुक्रवारी (ता.6) होणार आहे.तसेच चादर जुलूस तथा मिरवणूक शोभायात्रा याच दिवशी काढण्यात येणार आहे.तसेच ऊरुसानिमित्त रात्री नऊ वाजता मुईन नाजा (मुंबई) आणि नुसरत नाज मुंबई यांच्यामध्ये कव्वालीचा मुकाबला होणार आहे. तसेच शनिवारी (ता.7) रोजी अमान साबरी (मुंबई) आणि तहसीना नाज कर्नाटक म्हैसूर यांच्यात कव्वाली चा मुकाबला होणार आहे. याच दिवशी जीयारत तथा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हिंदू आणि मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी हैदराबाद, कर्नाटक,महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेशातून भाविक येथे बाबांचे आशीर्वाद घेऊन नवस सादर करण्यासाठी येतात.
ऊरुस कार्यक्रमानिमित्त गावाच्या प्रवेश द्वारा पासून प्रमूख रस्त्यावर बाजारपेठेत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ऊरुस समितीच्या वतीने मकबुल रज्जाक डांगे अध्यक्ष, इकराम मोईनुद्दीन खतीब उपाध्यक्ष, सलमान उस्मान शेख (बड़े) कोषाध्यक्ष, सिकंदर भाई कुरेशी सचिव, सदस्य उस्मान भाई तांबोळी,आहेमद भाई बागवान,बिलाल भाई पठाण, शाहरुख भाई खतीब,सरफराज भाई कुरेशी, साजीद भाई शेख, मुमताज भाई पटेल यांनी केले आहे.