धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित विभागीय खुल्या महिला भजन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
धाराशिव येथील कामगार कल्याण मंडळाच्या कामगार भवनमध्ये मंगळवारी (दि.3) या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी भजनी मंडळांचा सहभाग आहे. प्रत्येक मंडळास भजन सादरीकरणासाठी 25 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. 3 व 4 ऑक्टोबर अशा 2 दिवस या स्पर्धा चालणार आहेत. मंगळवारी (दि.31) महिला गट तर बुधवारी (दि.4) पुरूष गटाच्या स्पर्धा होणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विभागीय कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, महावितरणच्या कार्यकारी अभियंता निलांबरी कुलकर्णी, गुणवंत कामगार पुरस्कार मुर्ती कुलदीप सावंत, माजी नगरसेविका अंजना पवार, परीक्षक सुनिताताई आडसुळ, हभप पांडुरंग शिंपले, हभप राम ढेकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक केंद्र संचालक उमेश जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा भडंगे तर आभार प्रतिज्ञा वरखेडकर यांनी मानले.