धाराशिव (प्रतिनिधी)- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय  व्हि.पी. कॅम्पस धाराशिव येथील सातव्या सत्रातील कृषिकन्यां मोरे अंकिता, लोंढे संजिवनी, पाटील साक्षी , दळवी आकांक्षा, भोसले ऋतुजा, पांचाळ शितल यांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 अंतर्गत कृषिकन्यांनी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली.

तसेच पीक कर्ज प्रस्तावासंबंधी आवश्यक माहिती घेतली. मान्सूनचा पाऊस आल्यानंतर काही दिवसांतच पेरणी सुरू होते त्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज भासत असते. पीक कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते. मात्र, हे पीक कर्ज मिळवायचं कसं ? त्यासाठी कोणते कागदपत्र लागतात ? यासंबंधीत सविस्तर माहिती कृषीकन्यांनी घेतली. बँकेतून कर्ज काढताना शेतकऱ्यांना येणाऱ्या सामान्य त्रुटी समजून घेऊन त्या कशा टाळता येतील याबद्दल आवश्यक माहिती घेतली व त्या प्रकाराने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषिकन्यांना कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. भालेकर  एस. व्हि. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या प्रात्यक्षिका साठी माननीय प्रा. डॉ. क्रांतिकुमार पाटील महाविद्यालय व्यवस्थापक प्रा. घाडगे  एच.  एस. कार्यक्रम समन्वयक प्रा. शेटे डी. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. पाटील एस. एन. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


 
Top