धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे - पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील वडगाव (सि.) येथे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. आजपासून हे साखळी उपोषण सुरु करण्यात आले असून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला होता. ही मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपल्याने मनोज जरांगे - पाटील यांनी पुन्हा अंतरवली सराटी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील वडगाव (सि.) येथे मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. एक मराठा ... लाख मराठा..., आरक्षण आमच्या हक्काचं ... नाही कुणाच्या बापाचं.. अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

या साखळी उपोषणात गावातील मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. उद्यापासून हे आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार आहे.


 
Top