तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरुळ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर इटकळ -अक्कलकोट रस्त्यावर मंगळवार सकाळी टायर जाळुन शासनाचा निषेध केला. तसेच एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या जीवाचे बरेवाईट झाले तर याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील असा इशारा सकल मराठा समाज मंगरुळ यांनी दिला.