भूम (प्रतिनिधी)- शहरासह भूम तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या आंदोलनाने ढवळून निघाला आहे. मंगळवार दि 31 ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या बंदला तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवानी आपापली दुकाने उत्स्फुर्तपणे बंद ठेऊन 100 टक्के प्रतिसाद दिला. भूम शहरात आंदोलकांनी गोलाई चौक, जिजाऊ चौक, परांडा रोड, पार्डी रोड, चिंचोली, गोलाई चौक येथे टायर जाळून शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

तसेच आरक्षणाबाबत विवादित भूमिका मांडणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम, मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, ऍड गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देंवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस जोडे मारून चपलांचा हार घालण्यात आला. यावेळी पोनि प्रल्हाद सूर्यवंशी यांनी शांततेचे आवाहन केले. भूम शहरासह हद्दीतील गावांमध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य केले.


 
Top