भूम (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या भावना दुखवतील अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना देण्यात आले. 

ॲॅड. गुणरत्न सदावर्ते हे वारंवार सकल मराठा समाज बांधव तसेच आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य करत आलेले आहेत त्यामुळे मराठा समाज राजाच्या भावना सतत दुखावत आलेल्या आहेत त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर अनिल शेंडगे, ऍड विलास पवार, विठ्ठल बाराते, ॲड. अजित मोटे, ॲड. अरविंद हिवरे, ॲड. सुदर्शन पालकर, गणेश नलावडे,  बाळासाहेब मोटे, ॲड. प्रदीप गलांडे, अनिल कदम, ॲड. शेषनाथ भोगील, ॲड. सोमनाथ भोरे, ॲड. डि. आर. जावळे त्यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.


 
Top