भूम (प्रतिनिधी)- दिलीप जाधव चेरेकर यांनी महिलांबद्दल अश्लील व जाती वाचक गरळ ओखल्याने त्याच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भूमचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना देण्यात आले. 

सोशल मीडिया व इंस्टाग्राम वर दिलीप जाधव यांनी मागासवर्गीय महिलांबद्दल अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरून महिलांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून त्याचा बोलविता धनी कोण आहे याचा तपास करण्यात यावा अशी मागणी या निवेदनामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भूम शहराध्यक्ष रोहित गायकवाड, अक्षय गायकवाड, राजू सोनवणे, कचरू थोरात, संदीप सरवदे, स्वप्निल गरड, साहिल थोरात, प्रमोद गायकवाड, सचिन शिंदे, अजय गायकवाड, सायरन गायकवाड, राहुल बाराते, अनिकेत थोरात, किरण शिंदे, भय्या लगाडे,  चिराग गायकवाड, प्रतिक इजगज यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हजर होते.


 
Top