तेर (प्रतिनिधी)- डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले असतानाच धाराशिव तालुक्यातील तेर येथील 6 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

तेर ता.धाराशिव येथील पृथ्वीराज सुजीत कांबळे वय 6 वर्ष यास दोन दिवसापूर्वी ताप आल्याने तेर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु या बालकाची तब्येत खालावल्याने 5 आँक्टोबर रोजी सांयकाळी धाराशिव येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. परंतु त्याठिकाणी तब्येत जास्तच खालावल्याने कांही तासातच सोलापूर येथे नेण्यात आले. परंतु उपचार चालू असतानाच शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी पृथ्वीराज याचे निधन झाले. पृथ्वीराज हा एकुलता एक मुलगा होता. तेर येथील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी रूग्णालयात तापीच्या रोगाने रूग्न मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. शासनाने प्रभावशाली उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.


 
Top