तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे प्राध्यापक प्रबोधिनीचे तिसरे पुष्प गुंफताना प्रा.अनिल नवत्रे यांनी लोकशाहीत लोकांचा सदसद विवेक जागृत असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. 

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीच्या विकास प्रक्रियेत सर्वात महत्वाची भुमिका ही लोकांचीच म्हणजेच मतदारांची असते. लोकमान्य टिळकानंतर कॉग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी महात्मा गांधी यांच्याकडे आली त्यानंतर भारतीय राजकारणात आमूलाग्र असे बदल झाले हे बदल देश हिताचे होते. कारण राष्ट्रीय पातळीवर हा पक्ष कार्यरत असताना ते बदल अपेक्षित होते. बाल गंगाधर टिळक यांनी एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला होता तो समाजाने स्विकारला. महात्मा गांधींच्या आदर्श ही समाजाने स्विकारला. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका तितकीच महत्त्वाची होती. महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने मुंबई महाराष्ट्रात रहाणे आवश्यक होते आणि मराठवाडा महाराष्ट्रात येणे ही गरजेचे होते. कांहीं अंशी तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा या विषयावर गंभीरता दिसून येत नाही. परंतु महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक नेतृत्वानी या गोष्टीचा विरोध केला.

 मराठी सिनेमा क्षेत्रातील नामवंत अभिनेते दादा कोंडके यांचा एक मराठी सिनेमा एका सिनेमा गृहात प्रदर्शित करण्यासाठी त्यावेळी संबंधित चित्रपट गृहाच्या मालकांनी विरोध केला. त्यावेळी सर्वात पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेच्या बाबतीत केलेले आंदोलन आजही महाराष्ट्र विसरु शकत नाही. तेंव्हाचे राजकीय पक्ष एका सामाजिक व राजकीय अधिष्ठानावर ठाम होते. याच वैचारिक अधिष्ठानावर महाराष्ट्र राज्यात राजकीय पक्ष मोठे झाले. आधुनिक काळात ही भूमिका लोकशाहीच्या जनसामान्यात रुजली पाहिजे असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर हे म्हणाले की, एकुणच भारतीय राजकारण व आपल्या महाराष्ट्रातील राजकीय विचारधारा एका विशिष्ट आधारावर उभारलेली आहे. राजकीय धृविकरण हे लोकशाही साठी घातक ठरु शकते असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.बालाजी गुंड,प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर तसेच डॉ  रामा रोकडे यांनी पुढाकार घेतला. सदर प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top