तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे आणि सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत, या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील 5 ऑक्टोबर रोजी तुळजापुरात येणार आहेत. सकाळी 11वा वाजता  त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्याच्या निर्णय  मंगळवार   दि. 3 रोजी झालेल्या मराठा समाज समर्थक  संघटनेच्या बैठकीत निर्णय  घेण्यात आला.

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी दर्शना नंतर मनोज जरांगे पाटील हे श्रीतुळजाभवानी मंदीरा समोर मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी तुळजापुरात होणाऱ्या संवाद कार्यक्रमात मराठा बांधवांनी उपस्थित राहावे आणि ज्या मराठा बांधवांकडे कुणबी असल्याचा पुरावा असेल त्यांनी सोबत घेऊन यावे, असे आवाहनही सकल मराठा समाज तुळजापूर यांनी केले. मराठा आरक्षणसाठी संघर्ष करणारे योध्दा जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. दरम्यान, दि. 5 ऑक्टोबर 2023 रोजी ते तुळजापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शन घेवुन नंतर ते मराठा समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत. या बैठकीला स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी, जीवनराजे इंगळे, अर्जुन सांळुके, अजय सांळुके, प्रतिक रोचकरी, कुमार टोले, प्रशांत सोंजी, राहुल खपले, अमर  हंगरगेकर, सत्यजित साठे, महेश चोपदार सह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top