धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) ही संस्था महाराष्ट्र राज्य शासन, महाराष्ट्रातील 9 प्रमुख विद्यापीठे, शिक्षण संस्था व काही सामाजिक संस्था यांच्या सहयोगातून स्थापन झाली आहे. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात ही संस्था गेली 21 वर्षे कार्यरत आहे.

   15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्यसाधून परीक्षेचे आयोजन शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काही क्रांतिकारी, सत्याग्रह, स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरुष यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर आधारित परीक्षा द्यावी असा उपक्रम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविला गेला. आपल्या प्रशालेमध्ये महाराष्ट ज्ञान मंडळ मान्यताप्राप्त अधिकृत प्रशिक्षण केंद्र अण्णा इन्फोटेक व सिनर्जी इन्फोटेक तर्फे दिनांक 11 ते 14 ऑगस्ट 2023 रोजी हि परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये आपल्या प्रशालेतील  गुरूवर्य के. टी. पाटील फॉऊंडेशन वर्ग, श्रीपतराव भोसले हायस्कूल व श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज मधील इयत्ता 8 वी ते 11 वी च्या एकूण 3864 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 

यामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी आपापल्या इयत्तेमधून क्रमांक पटकावला. गुरूवर्य के. टी. पाटील फॉऊंडेशन वर्ग - देशमुख पृथ्वीराज संतोष, पाटील सृष्टी अनिल, म्हेत्रे वरद ऋषिकेत. इयत्ता 8 वी - गुंड आदिती संतोष, जाधव समृद्धी संतोष, जगदाळे स्वराज बळीराम. इयत्ता 9 वी - पाटील आशुतोष सुनील, गंभीरे प्रेरणा शाम, धुमाळ अश्वमेध अण्णासाहेब. इयत्ता 10 वी - वाघ शरद प्रदीप, बोराडे वैभव विकास, कवडे ज्ञानेश्वरी गोकुळदास. इयत्ता 11 वी- स्वामी जानवी वैजनाथ, पाटील वेदांती संतोष, सुरवसे अभिषेक मुकुंद. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेचे उपमुख्याध्यापक एस.बी . कोळी ,उपप्राचार्य संतोष घार्गे ,पर्यवेक्षक टी.पी . हाजगुडे ,वाय.के . इंगळे , एस.जी.कोरडे , एन.एन .गोरे,सौ. बी.बी.गुंड  व  गुरुवर्य के.टी. पाटील फाउंडेशन क्लास चे प्रमुख डॉ. विनोद आंबेवाडीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तरी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य  साहेबराव देशमुख , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी तथा अण्णा इन्फोटेक चे चेअरमन आदित्य सुधीर पाटील, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे धाराशिव जिल्ह्याचे  समन्वयक  धनंजय जेवळीकर, अण्णा इन्फोटेक चे समन्वयक श्री स्वामी यांनी विशेष अभिनंदन केले.


 
Top