धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेबाबत आढावा घेतला. यावेळी डीन मॅडम डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्याशी चर्चा करताना या वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या आठ महिन्यांपासून औषधांचा तुटवडा होत असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतू शकते ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी 8 दिवसात पुरवठा होईल असे आश्वासन दिले आहे. यासह सदर विषयासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना देखील निवेदन देण्यात आले. 

नांदेड आणि संभाजी नगर येथील रुग्णालयातील दुर्दैवी घटना पाहता शासकीय रुग्णालयांबाबत असलेली उदासीनता खेदजनक आहे. साधे खोकल्याच औषधे सुद्धा उपलब्ध असू नये? किती तो भोंगळ कारभार यातून सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. आपल्या जिल्ह्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहीलच परंतु जर 8 दिवसात औषधांचा पुरवठा झाला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील दिला.

यावेळी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव रोहित बागल, शहर सरचिटणीस अतुल  आदमाणे, रणवीर इंगळे, पंकज भोसले, हेमंत भोरे, सुरज वडवले, सुभाष गव्हाळे, अजिंक्य हिबारे, कुणाल कर्णवर आदी उपस्थित होते.


 
Top